माझे बालपणीचे साथीदार.
चांदोबातली चित्रं , श्रावणातल्या कहाण्यांच्या संग्रहातली चित्रं अश्या चित्रमय पुस्तकांतून आईचं बोट धरून माझा वाचनप्रयत्न सुरू झाला . श्रावणातल्या कहाण्या म्हणजे चित्रविचित्र गोष्टींचा जणू खजिनाच. अजूनही श्रावणात लहान होवून आईच्या कहाण्या ऐकाव्यात असं वाटतं.
Archive for सप्टेंबर, 2007
माझे बालपणीचे साथीदार.
सप्टेंबर 10, 2007सुर्यास्त
सप्टेंबर 10, 2007गजराच्या कर्कश्य आवाजाने
आज पहाटेच जाग आली,
मग कोकीळकूजन झाले
पण तुला ऐकवायचे राहून गेले.
जाग आली तेव्हा अन्गावर
पान्घरूण अलवार चान्द्ण्याचे
खिडकीत दुधाळ चान्द होता
पण तुला दाखवायचा राहुन गेला.
चहा-पाणी होता होता
सुर्योदय झाला
तुझ्यासवे पाहायचा
तो मी एकटीनेच पाहीला.
प्रसन्न अश्या ह्या सकाळी
माझ्या मनात उमटले गाणे
तुझ्या घड्याळाच्या तालावर
मी ते मनातच म्हटले.
तुला निरोप देताना
ही आशा आहे मनात
सुर्यास्त पाहाताना तरी
असेल मझ्या हाती तुझा हात.
मैत्रीण
सप्टेंबर 10, 2007ती माझी जीवाभावाची सखी. कॉलेजमधली मैत्रीण. साधी-भोळी, निर्मळ मनाची , हसरी . सर्व ‘मुलींच्या गोष्टींमध्ये’ तिला भारी रस. मेन्दी काढणे, चेहेर्याची शोभा वाढवण्यासाठी कसले कसले लेप लावणे , नवीन नवीन केशभूषा करणे ह्या सगळ्यात ती पटाईत . लिंकिंग रोडला जाऊन नव्या नव्या फॅशनचे कपडे घासाघिस करून स्वस्तात मिळवणे हा तिच्या डाव्या हातचा मळ. भाबड्या स्वभावामुळे [...]
ताज्या प्रतिक्रिया