सुर्यास्त
गजराच्या कर्कश्य आवाजाने
आज पहाटेच जाग आली,
मग कोकीळकूजन झाले
पण तुला ऐकवायचे राहून गेले.
जाग आली तेव्हा अन्गावर
पान्घरूण अलवार चान्द्ण्याचे
खिडकीत दुधाळ चान्द होता
पण तुला दाखवायचा राहुन गेला.
चहा-पाणी होता होता
सुर्योदय झाला
तुझ्यासवे पाहायचा
तो मी एकटीनेच पाहीला.
प्रसन्न अश्या ह्या सकाळी
माझ्या मनात उमटले गाणे
तुझ्या घड्याळाच्या तालावर
मी ते मनातच म्हटले.
तुला निरोप देताना
ही आशा आहे मनात
सुर्यास्त पाहाताना तरी
असेल मझ्या हाती तुझा हात.
सप्टेंबर 12, 2007 at 7:26 सकाळी
Geeta,
This is really a lovely poem. With your permission, I am going to use this in my ‘Nivedan’ which I am making for Maharashtra Mandal Kuwait’s Annual Day function….
सप्टेंबर 12, 2007 at 12:06 pm
Vaishali,
Please feel free to use it. I’m happy that it is reaching so many people.
Geeta.
नोव्हेंबर 19, 2008 at 8:43 सकाळी
good