मकर संक्रांत
संक्रांतीच्या दिवशी सकाळी सकाळी २-२ च्या रांगा करून शाळेतल्या मुलांची शाळेभोवतालच्या परीसरात मिरवणूक निघत असे. बरोबर काहि छान सजवलेल्या बैलगाड्या असत . त्यात अगदी बालवाडितली लहान मुले दमल्यावर बसवली जात .
आमच्या हातात संदेश लिहिलेल्या पाट्या असत .
” मुले हीच राष्ट्राची खरि संपत्ती “
” मुले हेच राष्ट्राचे खरे आधारस्तंभ “
अश्या काही अजूनही आठवतात . आम्ही खरि संपत्ती आणि खरे आधारस्तंभ आहोत ह्या जाणीवेने आम्हा सर्वांना चेव चढे आणि मग जोरजोरात ओरडून ओरडून त्या घोषणा दिल्या जात .
काही खास गाणीही होती त्या दिवशीची .
” बालवीर आम्ही मात्रुभूमीचे ,
छोटे सैनिक ह्या देशाचे ,
देऊ घोषणा झेन्ड्याखाली
जयहिंद जयहिंद बलशाली . “
अश्या काही ओळी आठवताहेत अजून . (लहानपणी त्यातला बलशाली हा शब्द ‘वैशाली ‘ असा वाटायचा . त्यामुळे त्या शब्दावर वर्गातल्या वैशाल्यांकडे माना वळायच्या .)
घोषणा देत व गाणी म्हणत मिरवणूक कधी संपे ते कळतही नसे . मग तीळ्गूळ , ऊस आणि हरभर्याची जुडी असा खाऊ मिळे. घरच्या तीळ्गूळापेक्षा त्या खाऊची फार अपूर्वाई वाटे. ऊसाने लुटूपुटूची मारामारी करत घरच्या गूळपोळ्यांचा समाचार घ्यायला आम्ही परतत असू.
मोठ्या विद्यार्थिनींना संक्रांतीच्या आदल्या दिवशी तीळ्गूळाचे लाडू वळायला शाळेत बोलावत असत . ( हा अंदाजे २५ ते ३० वर्षांपूर्वीचा काळ आहे. तेव्हां मुली घरकामात मदत करत असत . त्यामुळे शाळेत लाडू वळणे म्हणजे संकट नव्हते वाटत. आजच्या काळात मुलांना लाडू वगैरे करायला शाळेत बोलावलं तर बहुतेक पालक खटलाच भरतील .)
संक्रांतीच्या आदल्या दिवशी छोट्या शाळेत तीळगूळाचा कारखाना चालू असे . आपल्या शिक्षिका पदर खोचून लाडू वळताना पाहून मजा वाटत असे. समोरचा लाडवांचा ढीग बघून स्फुरण चढत असे . त्या गरम गरम मिश्रणाचे लाडू वळताना हाताला बसणारे चटकेही मग जाणवत नसत . आणि बालदिनाला हातात पडणार्या तीळगूळाला आपलाही हातभार लागला आहे ही कल्पना सुखावणारी असे.
संध्याकाळी पालकांसाठी तीळगूळ समारंभ असे. सांस्क्रुतिक कार्यक्रमही असत्. आणि पालक आवर्जून ह्या समारंभाला हजेरि लावत .
ह्या संक्रांतीलाही नेहमीप्रमाणेच आठवणी आल्या . नेहमीप्रमाणेच लहान होवून शाळेत जावंस वाटलं. मनातल्या मनातच घोषणा दिल्या आणि गाणी गायली . तीळ्गूळ खात खात शेवटी त्या आठवणी कागदावर सांडल्या .
तीळगूळ घ्या गोड गोड बोला .
Explore posts in the same categories: Uncategorized
जानेवारी 16, 2010 at 5:44 pm
खूपच छान! वाचताना खरेच जुने दिवस आठवले. मी सुद्धा नकळत म्हणून गेले “एक दोन तीन चार, बालमोहनची मुलं हुश्शार”
फेब्रुवारी 3, 2010 at 4:57 सकाळी
Very good article!
फेब्रुवारी 3, 2010 at 4:09 pm
hi geeta,
atach vachale tuze vicharmanthan, khupach sundar, mala ekdum shaletali geeta sapadalyasarakhe zale, khup lihit raha ani navin updates klalavat raha, lage raho gitabhay.
फेब्रुवारी 7, 2010 at 9:14 pm
सुंदर. जुने सोनेरी दिवस आठवले. काळ जाता जाता धूसर होणार्या ह्याअनमोल आठवणी शब्दात वर्णन करून ठेवल्याबद्दल धन्यवाद.
फेब्रुवारी 10, 2010 at 5:12 pm
Khupach chhan !!! amche nav vachun bare vatale.keep it up.