Archive for the 'Uncategorized' Category

‘तारे जमिन पर’ आणि ‘जिंकी रे जिंकी’.

जानेवारी 7, 2008

नुकतेच दोन सुंदर चित्रपट बघण्याचे योग आले. एक ‘तारे जमिन पर’ आणि  दुसरा मराठी , ‘जिंकी रे जिंकी’.
एरवी सिनेमा जुना झाल्याशिवाय मी बघत नाही. अतीप्रसिद्धीमुळे थियेटरवर उडणारी गर्दी , ते मल्टिप्लेक्सचे अव्वाच्या  सव्वा दर हे सगळं टाळायचं असेल तर काही आठवडे वाट  पहाणं अधिक बरं वाटतं. काही परीक्षणं वाचली, कुणाच्या तोंडून प्रशंसा ऐकली तरच मी [...]

माझे बालपणीचे साथीदार.

सप्टेंबर 10, 2007

माझे बालपणीचे साथीदार.
चांदोबातली चित्रं , श्रावणातल्या कहाण्यांच्या संग्रहातली चित्रं अश्या चित्रमय पुस्तकांतून आईचं बोट धरून माझा वाचनप्रयत्न सुरू झाला . श्रावणातल्या कहाण्या म्हणजे चित्रविचित्र गोष्टींचा जणू खजिनाच. अजूनही श्रावणात लहान होवून आईच्या कहाण्या ऐकाव्यात असं वाटतं.

सुर्यास्त

सप्टेंबर 10, 2007

गजराच्या कर्कश्य आवाजाने
आज पहाटेच जाग आली,
मग कोकीळकूजन झाले
पण तुला ऐकवायचे राहून गेले.
जाग आली तेव्हा अन्गावर
पान्घरूण अलवार चान्द्ण्याचे
खिडकीत दुधाळ चान्द होता
पण तुला दाखवायचा राहुन गेला.
चहा-पाणी होता होता
सुर्योदय झाला
तुझ्यासवे पाहायचा
तो मी एकटीनेच पाहीला.
प्रसन्न अश्या ह्या सकाळी
माझ्या मनात उमटले गाणे
तुझ्या घड्याळाच्या तालावर
मी ते मनातच म्हटले.
तुला निरोप देताना
ही आशा आहे मनात
सुर्यास्त पाहाताना तरी
असेल मझ्या हाती तुझा हात.

मैत्रीण

सप्टेंबर 10, 2007

ती माझी जीवाभावाची सखी. कॉलेजमधली मैत्रीण. साधी-भोळी, निर्मळ मनाची , हसरी . सर्व ‘मुलींच्या गोष्टींमध्ये’ तिला भारी रस. मेन्दी काढणे, चेहेर्याची शोभा वाढवण्यासाठी कसले कसले लेप लावणे , नवीन नवीन केशभूषा करणे ह्या सगळ्यात ती पटाईत . लिंकिंग रोडला जाऊन नव्या नव्या फॅशनचे कपडे घासाघिस करून स्वस्तात मिळवणे हा तिच्या डाव्या हातचा मळ. भाबड्या स्वभावामुळे [...]