घरगुती झटपट पिझ्झा पिझ्झा हा हल्लीचा एक अति आवडता पदार्थ आहे. आणि junk food खाण्याची आवड मला कायमच आहे. त्यात मिरची व मसाल्याचे वावडे . त्यामुळे कमी तिखट, कमी मसालेदार परंतु तरीही जंक प्रकारात मोडणारे नूडल्स, पिझ्झा हे खाद्यपदार्थ माझे विशेष आवडीचे . पण …… पण पण पण हे पदार्थ समाधानकारक आणि रास्त किमतीत… आमची झटपट रेसिपी: पिझ्झा वाचन सुरू ठेवा
टुरिंग टोकीज
टुरिंग टोकीज : निर्माती तृप्ती भोइर आणि दिग्दर्शक गजेंद्र अहिरे ह्यांचे अभिनन्दन. नुकताच हा नवीन मराठी चित्रपट पाहिला. पब्लिसिटी बर्यापैकी झाली होति. पुन्हा एक सांस्र्कृतिक व सामाजिक संदर्भ असलेला विषय म्हणून कुतूहल चाळवलं गेलं . चित्रपट गृहात मोजकी माणसं होति. चित्रपटाची सुरुवात टुरिंग टोकीज च्या संक्षिप्त इतिहासाने होते. चांदी हि सिनेमाची नायिका ह्या टोकीज च्या… टुरिंग टोकीज वाचन सुरू ठेवा
मकर संक्रांत
मकर संक्रांत !! सूर्याच्या मकरव्रुत्तातून संक्रमणाचा दिवस ; तीळगूळ द्यायचा घ्यायचा दिवस ; सुगडांचं वाण द्यायचा दिवस ; काळ्या साडिचा दिवस ; काटेरी हलव्याचा दिवस . आणि माझ्या शाळेत — बाल दिवस .संक्रांत आली आणि शाळेची आठवण आली नाही असं होउच शकत नाही. सर्वांचा बालदिन १४ नोव्हेंबरला असतो. परंतू आमच्या शाळेत मात्र १४ जानेवारिला ,… मकर संक्रांत वाचन सुरू ठेवा
‘तारे जमिन पर’ आणि ‘जिंकी रे जिंकी’.
नुकतेच दोन सुंदर चित्रपट बघण्याचे योग आले. एक ‘तारे जमिन पर’ आणि दुसरा मराठी , ‘जिंकी रे जिंकी’. एरवी सिनेमा जुना झाल्याशिवाय मी बघत नाही. अतीप्रसिद्धीमुळे थियेटरवर उडणारी गर्दी , ते मल्टिप्लेक्सचे अव्वाच्या सव्वा दर हे सगळं टाळायचं असेल तर काही आठवडे वाट पहाणं अधिक बरं वाटतं. काही परीक्षणं वाचली, कुणाच्या तोंडून प्रशंसा ऐकली तरच… ‘तारे जमिन पर’ आणि ‘जिंकी रे जिंकी’. वाचन सुरू ठेवा
माझे बालपणीचे साथीदार.
माझे बालपणीचे साथीदार.
चांदोबातली चित्रं , श्रावणातल्या कहाण्यांच्या संग्रहातली चित्रं अश्या चित्रमय पुस्तकांतून आईचं बोट धरून माझा वाचनप्रयत्न सुरू झाला . श्रावणातल्या कहाण्या म्हणजे चित्रविचित्र गोष्टींचा जणू खजिनाच. अजूनही श्रावणात लहान होवून आईच्या कहाण्या ऐकाव्यात असं वाटतं.
सुर्यास्त
गजराच्या कर्कश्य आवाजाने आज पहाटेच जाग आली, मग कोकीळकूजन झाले पण तुला ऐकवायचे राहून गेले. जाग आली तेव्हा अन्गावर पान्घरूण अलवार चान्द्ण्याचे खिडकीत दुधाळ चान्द होता पण तुला दाखवायचा राहुन गेला. चहा-पाणी होता होता सुर्योदय झाला तुझ्यासवे पाहायचा तो मी एकटीनेच पाहीला. प्रसन्न अश्या ह्या सकाळी माझ्या मनात उमटले गाणे तुझ्या घड्याळाच्या तालावर मी ते… सुर्यास्त वाचन सुरू ठेवा
मैत्रीण
ती माझी जीवाभावाची सखी. कॉलेजमधली मैत्रीण. साधी-भोळी, निर्मळ मनाची , हसरी . सर्व ‘मुलींच्या गोष्टींमध्ये’ तिला भारी रस. मेन्दी काढणे, चेहेर्याची शोभा वाढवण्यासाठी कसले कसले लेप लावणे , नवीन नवीन केशभूषा करणे ह्या सगळ्यात ती पटाईत . लिंकिंग रोडला जाऊन नव्या नव्या फॅशनचे कपडे घासाघिस करून स्वस्तात मिळवणे हा तिच्या डाव्या हातचा मळ. भाबड्या स्वभावामुळे… मैत्रीण वाचन सुरू ठेवा